शिबिराचे उद्घाटन समारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. बोढेकर सरांचे भाषण :
शिबिराचे उद्घाटन :
वढा ग्रामपंचायत परिसरात , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे पुढे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. ठिक सायंकाळी ५.३० वाजता कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार केंद्र चंद्रपूर चे सहाय्यक आयुक्त श्री. भैय्याजी येरमे यांच्या शुभ हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे होते. विशेष अतिथी म्हणून नशामुक्ती भारत अभियान शासकीय समितीचे सदस्य श्रीधर मालेकर, वढाचे सरपंच किशोर पाटील वरारकर,म.गां.तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष श्री. किशोर हागे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .अशोक हागे, जि. प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुदर्शन नैताम , ग्रामपंचायत सदस्य सुरेश वरारकर, सौ. उषा मोहिते, सुनील निखाडे, सौरभ वरारकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली होती . सर्वप्रथम अतिथी च्या हस्ते संगम तिरी स्थित प्रभू श्री पांडुरंग मूर्तीचे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.